अमळनेर अर्बन बँकेचा निकाल.मातब्बरांचा पराभव तर नवख्यांची एन्ट्री…

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर अर्बन बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल ने ११,माऊली पॅनल ने १ तर एका अपक्षाने बाजी मारली आहे.सहकार पॅनल ने बँकेवर निर्विदाद वर्चस्व मिळविले आहे.
अमळनेर अर्बन बँकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून सहकारचे प्रविण जैन (३९७३),पंकज मुंदडे(३९०३),ललवाणी भरतकुमार(३६७४),अग्रवाल प्रदिप(३५७२),साळी दिपक(३३२५),पाटील अभिषेक (३२४०),पाटील प्रविण(३०४७) तर अपक्ष महाजन लक्ष्मण(३७२५) यांनी विजय मिळविला.महिलांमध्ये सहकार च्या लांडगे वसुंधरा(३७४२) तर माऊली पॅनल च्या डॉ.लाठी मनिषा(२५०३).इतर मागासवर्गीय मतदारसंघात सहकार च्या चौधरी पंडित(२९३२),एस.सी./एस. टी. मतदारसंघात शिंदे रणजित(२२२६),भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून सातपुते मोहन (४०१०) मते घेऊन विजयी झालेत.
मातब्बरांचा पराभव तर नवख्यांची एन्ट्री
माजी उपनगराध्यक्ष व सहकार चे मात्तबर उमेदवार सैनानी लालचंद,मा.नगरसेवक सुरेश पाटील,माऊली पॅनल प्रमुख व बँकेचे माजी चेअरमन मुन्ना शर्मा यांना पराभवाचा धक्का बसला तर सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,लक्ष्मण महाजन तर महिलांमधून डॉ.मनीषा लाठी या नवख्या उमेदवारांची एन्ट्री झाली आहे.
२८ टेबलवर पार पडली मतमोजणी
सकाळी ८ वाजेपासून २८ टेबलवर ६५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम.जगताप,सहाय्यक निर्णायक अधिकारी सुनील महाजन,मदतनीस सुनील पाटील यांनी काम पाहिले.