अमळनेर दंगलीतील अजून दोन आरोपींना अटक..

अमळनेर (प्रतिनिधि) शहरातील दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणी जिनगर गल्लीतील अजून दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
जिनगर गल्लीत राहणाऱ्या मोहसीनखान सलीमखान (वय 30) व मोहम्मद मसूद अब्दुल हमीद (वय 38) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 61 जणांच्या यादी व्यतिरिक्त हे दोन आरोपी पोलिसांच्या अधिक चौकशीत आढळून आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश येलमाने यांनी त्यांना 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.