अमळनेर तालुक्यातील मारवड येथे किराणा दुकानाला भीषण आग..

अमळनेर (प्रतिनिधि)तालुक्यातील मारवड येथील एका किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने दुकानातील अंदाजे ८ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना आ
ज रविवारी ११ रोजी सकाळी पहाटे उघडकीला आली आहे.

तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलात भाडे तत्वावर असलेले राजेंद्र भगवान पाटील उर्फ राजू चोपडेकर यांचे शिव जनरल अँड किराणा दुकान आहे. या दुकानाला आज रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. दुकानात असलेले रोकडसह साहित्य असा जवळपास अंदाजे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.