धुळे शहरातील राजेंद्र सुरी नगर येथील जैन मंदीरातील चोरी करणाऱ्या टोळीला मुददेमालासह अटक…. चाळीसगांव रोड पोलीस स्टेशन पोलीसांना यश….

धुळे (अनिस अहेमद) 26/05/2023 रोजीचे सकाळी 06.00 वाजेच्या दरम्यान धुळे शहरातील राजेंद्र सुरी नगर भागातील श्री पार्श्वनाथ भगवान व श्री नाकोडा भैरव भगवान मंदीराचे बंद दरवाजाचे कुलूप तोडुन मंदीरातील मुर्तीवरील सोन्या चांदीचे दागिणे चोरुन व दान पेटी फोडुन मंदीरातील दागिणे अज्ञात आरोपीतांनी चोरी केले बाबत दिनांक 26/05/2023 रोजी अज्ञात आरोपीताविरुध्द विजय तेजराज राठोड यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरुन चाळीसगांव रोड पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि / संदीप ठाकरे हे करीत आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपीतांचा चाळीसगांव रोड पोलीसांनी तपास केला असता आरोपीत हा सुरत येथे असल्याचे समजल्याने त्याचा सुरत येथे जावुन आरोपी नामे 01) आसीफ शहा गफुर शहा फकीर वय 40 रा. नुरानी मशिद जवळ 80 फुटी रोड धुळे यांस गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवुन दिनांक 09/06/2023 रोजी 22.20 वाजता अटक करण्यात आली असुन त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचा साथीदार इमरान असल्याचे सांगितल्याने 02) इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या वय 23 रा. अंबिका नगर धुळे यांस दिनांक 11/06/2023 रोजी 18.16 वाजता अटक करण्यात आली असुन आरोपी क्रमांक 01 याचेकडुन चांदीचे 02 मुकुट सेट एकुण 1,60,000/- रुपये किंमतीचे व आरोपी क्र. 02 याचेकडुन मेमोरंडम पंचनाम्यात सोन्याची 02 पट्टी एकुण 1,20,000/- रुपये किंमतीचे असा एकुण 02,80,000/- रुपये किंमतीचे एकुण मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी क्रमांक 02 ) इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या याचे कडुन मेमोरंडम पंचनामा करते वेळी त्याचे राहते घरात 12 गुंगीकारक औषधी बाटल्यांचा साठा मिळुन आल्याने त्याचे विरुध्द NDPS कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक संजय बारकुंड सो., अप्पर पोलीस अधिक्षक किशोळ काळे सो, सहा. पोलीस अधिक्षक सो. ऋषीकेश रेड्डी सो. धुळे शहर विभाग धुळे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोनि/ हेमंत पाटिल सो. पोनि/ धिरज महाजन सो. पोउपनि / संदीप ठाकरे, पोउपनि / विनोद पवार, पोहेकॉ / 1242, पंकज चव्हाण, पोहेकॉ / 1120 रविंद्र ठाकुर, पोहेकाँ/416 संदिप पाटील, पोकॉ/1568 इंद्रजित वैराट, पोकाँ/1180, स्वप्नील सोनवणे, पोकॉ/1501 पंकज शिंदे, पोकॉ/833 सारंग शिंदे, पोकॉ/1480 देवेंद्र तायडे, पोकों/ 1686 शरद जाधव, पोकॉ/29 चेतन झोळेकर,
पोका /742 संदिप वाघ, पोकॉ/512 सोमनाथ चौरे, अशांनी केली आहे.