गुरुपौर्णिमेनिमित्त साई गजानन संस्थान एरंडोल येथे उत्सवाचे आयोजन..

.
भक्तांना संस्थेचे मदत करण्याचे आवाहन.
एरंडोल (प्रतिनिधी ) – एरंडोल येथील सर्व साई गजानन संस्थांतर्फे या वर्षी देखील सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी गुरु पौर्णिमेसाठी जास्तच जास्त साई गजानन भक्तांनी मंदिरात येऊन उत्सवाला मदत करावी व मदतही धान्य स्वरूपात किंवा रोख स्वरूपात स्वीकारली जाणार आहे. दरवर्षी या उत्सवात सर्व महिला वर्ग पोळ्या मंदिरात पाठवतात आणि शिरा व भाजी ही मंदिरात केली जाऊन सर्वप्रसाद भक्तांना वाटला जातो तसेच येणाऱ्या सर्व भक्तांना चहा दिला जातो.
श्री.साईबाबा व संत गजानन महाराज यांच्या आंघोळीसाठी तापी नदीचे पाणी.
तसेच ज्या भक्तांना दोन्ही बाबांना आंघोळ घालायची असेल त्यांना तीन तारखेला सकाळी सहा ते आठ मध्ये अंघोळीला येता येईल बाबांच्या अंघोळीला संस्थांतर्फे गेल्या दोन वर्षापासून तापीचे पाणी आणले जाते म्हणून एक तारखेला सावखेडा ते एरंडोल पायी कावड यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.ज्याला कावड यात्रेला यायचे असेल त्याने तीस तारखेपर्यंत मंदिरात नावे द्यावीत असे संस्थांच्या वतीने कळविण्यात आले असुन त्या व्यक्तींना एक तारखेला सकाळी सावखेडा ला नेले जाईल.सकाळी सहाला गाडी निघेल. दिवसभर लागणारा चहापाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी ज्या महिला अगर पुरुषांना कावड यात्रेत यायचे असेल त्यांनी त्वरित बापू मोरेसर यांच्याशी संपर्क साधावा व आपले नाव लिहून द्यावे कारण ५० कावडच आणायचे आहे असे संस्थांतर्फे कळविण्यात आले आहे तसेच उत्सवाला लागणारा पैसा संस्थांतर्फे गावातून घरोघरी जाऊन गोळा केला जात नसल्याने भक्तांनी ज्यांना इच्छा असेल त्यांनी मंदिरात जाऊन पावती फाडावी.जे भक्त या उत्सवात वर्गणी देतील त्यांची नावे जाहीर करण्यात येतील. तरी कृपया आपल्या मंदिरास योग्य ती मदत करावी असे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले आहे .
दरम्यान उत्सवाची सुरुवात एक तारखेला कावड यात्रा, तीन तारखेला सकाळी पाच ते आठ दोन्ही बाबांचे मंगल स्नान ,तीन तारखेला सकाळी नऊ ते दुपारपर्यंत बाबांची गावातून पालखी निघेल. पालखी मार्ग पालखी मंदिरातून गुजर गल्लीतून, नथू बापू कडून गांधी पुऱ्यात जाईल,तेथून पालखी विठ्ठल मंदिरात जाईल,तेथून गुजर गल्ली कडून मंदिरात पालखी परत येईल तरी भक्तांनी पालखीला योग्य ते सहकार्य करावे असे संस्थांतर्फे कळविण्यात आले आहे तसेच संध्याकाळी पाच वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटला जाईल तरी सर्व साई गजानन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व उत्सवात योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले आहे.