नव नियुक्त लष्करी अधिकारी अमन पटेल चे जळगावी स्वागत…

जळगाव ( प्रतिनिधि)
डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून जळगाव चा एकमेव तरुण अमन अनमोल पटेल याने इंडियन एअर फोर्स मध्ये लेफ्टनंट म्हणून

पास आऊट होऊन तो आपल्या राहत्या घरी जळगाव येथे १३ जून रोजी सकाळी राजधानी एक्सप्रेस ने आला असता त्याचे रेल्वे स्टेशन येथे जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, बाबा मोटर्स कुटुंबीय जमील मलिक, सोहेल मलिक व नीहाल मलिक यांनी स्वागत केले.
लेफ्टनंटअमन पटेल सोबत त्यांचे वडील पोलीस विभागात कार्यरत असलेले अनमोल पटेल व आई श्रीमती पटेल या सुद्धा उपस्थित होत्या.
लेफ्टनंट अमन पटेल ची दिल्ली मुख्यालयात पोस्टिंग झाली असून ते 1 जुलै रोजी हजर होणार आहेत.
मुस्लिम समाजातील व त्यातल्या त्यात लहान असलेल्या पटेल बिरादरीच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने यश मिळविल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
अशा या लेफ्टनंटअमन अनमोल पटेल यांचे मेहरूण वासिया तर्फे खास अभिनंदन करण्यात येत आहे.