धार्मिक सलोखा व एकोपा साठी लोकप्रतिनिधी,प्रशासन व नागरिकांनी एकत्रित यावे – जळगाव शिष्टमंडळाची अमळनेरकराना विनंती…

0

अमळनेर (प्रतिनिधि)

धार्मिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर जातीय ऐक्य आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा आणि सौहार्दपूर्ण वातावरण अबाधित रहावे या एकमेव हेतूने जळगाव शहरातील शिष्टमंडळाने अमळनेर ये

थील दंगलग्रस्त भागास भेट देऊन तेथील 22 मोहल्याच्या जबाबदार प्रतिनिधीशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना संविधानाचे रक्षण करणे असल्याने न्यायाने वागणं व कायद्याचा धाक असणे आवश्यक असल्याची बाब शिष्टमंडळाचे समन्वय जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केली.

नागरिकांशी संवाद साधताना फारुख शेख व मजहर पठाण

बेरोजगार तरुणांना व युवकांना काही धर्माच्या ठेकेदारांनी दोन समाजात तेढ निर्माण करणे थांबवायला पाहिजे अन्यथा त्याची शिक्षा येणाऱ्या पिढीला भोगावी लागेल.
अमळनेर शहराला एक इतिहास असताना सुद्धा येथील नागरिक संविधानाचे रक्षण करत नसल्यामुळे या एकाच वर्षात सहा वेळा दंगलीला समोर जात असल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा व समन्वय

पोलीस उप अधीक्षक अमळनेर विभाग सुनील नंदवालकर यांची सुद्धा या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेच्या समन्वयांमधून काही गैरसमज दूर करण्यात आले. पोलीस व नागरिक यांच्यामध्ये एक सेतू तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा या वेळी करण्यात आला. तेव्हा अमळनेर येथील काही समाजसेवक सुद्धा उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी सोबत शांततेसाठी प्रयत्न

या शिष्टमंडळाने अमळनेर शहराचे लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली व आपण जरी एक राजकारणी असले तरी आपण धर्मनिरपेक्षता मानणारे एक नागरिक असल्याने आपण अमळनेर सारख्या शहराला जो कोणी धर्माच्या ठेकेदारांनी तेढ निर्माण करण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न करीत आहे ते थांबवण्यासाठी आपण मैदानात उतरून दोघी समाजा मध्ये भाईचारा व आपुलकी निर्माण करण्यासाठी त्वरित शांतता समिती ची बैठक नव्हे तर शांतता समन्वय साठी प्रयत्नशील असणाऱ्या व संविधानावर विश्वास असणाऱ्या समूहाशी समन्वय साधून हा शहराला लागलेला काळा डाग पुसण्यासाठी व दोन्ही समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करण्यात आली.

लोकप्रतिनिधी- पोलीस प्रशासन व समाजाचा पाठिंबा

जळगावच्या या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधी आमदार अनिल पाटील, पोलीस प्रशासकीय प्रमुख पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवालकर व २२ वार्डातील नागरिकांशी चर्चा केल्यावर संबंधित या तिन्ही संस्थांनी भाईचारासाठी व शांतता प्रस्थापित साठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू असे अभिवचन दिले.

जळगाव शिष्टमंडळात यांचा होता समावेश

जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल चे अध्यक्ष मजहर पठाण, राष्ट्रीय काँग्रेस जळगाव शहर महानगर अध्यक्ष अमजद पठाण, जळगाव ईदगाह ट्रस्ट सचिव अनिस शहा, हुसेनी सेना जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर फाउंडेशन अध्यक्ष अनवरखान यांचा समावेश होता .
अमळनेर तर्फे यांचे लाभले सहकार्य

मौलाना रियाज, एडवोकेट शकील काझी,साजिद शेख, रज्जाक शेख, सलीम शेख व अमजद खान ,सामाजिक संघटनेचे नगरसेवक मुक्तार खाटीक, इमरान खाटीक, हाजी शब्बीर, हाजी नसीर, हाजी शेखा मिस्तरी, पत्रकार मुन्ना शेख, पत्रकार आबिद शेख, नूर खान, डब्बिर् पठाण, इक्बाल शेख, रियाज काकर, सईद शेख, राजू शेख ,रिजवान मनियार, आबिद मनियार यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!