शासन आदेश असून सुद्धा रेशन उपलब्ध करून देत नाही तर मग येथिल रेशन जाते कुठे ? महिलांचा अनिल अण्णा गोटेना प्रश्न…

धुळे (प्रतिनिधि) धुळे शहरातील प्रभाग क्र.७ मोगलाई साक्री रोड ड्रायवर गल्ली येथील रहिवासी मुस्लीम माता भगिनींनी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांची आज भेट घेतली
यावेळी प्रभाग क्र – ७ येथील मागील २७ सप्टेंबर २०२२ रोजी साधारणतः २०० महिलांनी अण्णा साहेब यांच्याकडे रेशन दुकान क्र – २०,४४,४६ हे

गेली ३ वर्ष ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन असेल किंवा नसेल तरी शासन आदेश असुन सुद्धा रेशन ऊपलब्ध करून देत नाहीत तर मग येथील रेशन जाते तरी कुठे?असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.व तीन्ही रेशन दुकानदारांच्या आरेरावी संधर्भात लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. त्याच अनुषंगाने पाठपुरावा करून घेत भ्रमणध्वनी द्वारे पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत श्री गोटे साहेबांनी उपस्थित माता भगिनींना ८ दिवसात त्यांच्या रेशन च्या कामासाठी आश्वासन देत त्याच वेळी धुळे जिल्हा अधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधून आलेल्या महिलांची त्यांच्या अडीअडचणी विषयी जाणीव करून दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक चे ग्रामीण अध्यक्ष सलीम भाई शेख,प्रदेश संघटक सचिव हाजी हाशिम भाई कुरेशी,ज्येष्ठ अकबरअली सय्यद सर,शहर उपाध्यक्ष असलम भाई खाटीक,आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलम भाई खाटीक यांनी दिली व श्री अविनाश राजाराम लोकरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिद्ध केली…