अखेर ते २९ बालक बिहार साठी रवाना..
भुसावळ हुन भागलपुर एक्सप्रेसने राखीव डब्याने प्रवास…

जळगाव (प्रतिनिधि)
३० मे रोजी लोहमार्ग भुसावळ पोलिसांनी २९ बालकांना रेस्क्यू करून बालकल्याण समितीला स्वाधीन केले होते त्या बालकांच्या सुटकेसाठी जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व विविध संघटना यांनी प्रशासनासोबत फॉलो अप घेऊन अखेर आज मंगळवार १३जून रोजी त्या २९ बालकाची सुटका बालकल्याण समितीने करून खाजगी गणवेशधारी पोलिसांसह त्यांची रवानगी
बिहार मधील व पुरनिया व अरराई जिल्हा बालकल्याण समितीकडे केलेली आहे.

भागलपुर एक्सप्रेस ने राखीव कोच ने प्रवास
जळगाव ते भुसावळ या
बालकांचा व पोलिसांचा प्रवास दोन खाजगी टेम्पो ट्रॅव्हलमधून मनियार बिरादरीच्या माध्यमाने व ट्रेंड इंगिनीअरिंग चे साजिद शेख यांच्या सहकार्याने करण्यात आला. शासनातर्फे भुसावळ ते भागलपुर रेल्वेत राखीव डबा उपलब्ध करून प्रवासाला दुपारी तीन वाजता भुसावळ वरून सुरुवात झाली.
जळगाव व भुसावळ स्टेशनला बालकांना निरोप

या बालकांना निरोप देण्यासाठी जळगाव जिल्हा मनियार बीरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, जिल्हा अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मझहर पठाण, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अनवर खान, ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शहा, हुसैनि सेना चे अध्यक्ष फिरोज शेख, भुसावळ चे इम्तियाज शेख, नदीम बागवान, साजिद शेख, टीसी अकील शेख, नवीद शेख, सह जीआरपी पोलीस निरीक्षक विजय बाबा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.