एरंडोल येथील राजस्थानी महिला मंडळाची त्रिवार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न;
अध्यक्षपदी सौ उज्वला राठी तर सचिव पदी सौ शशिकला पांडे यांची निवड.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील राजस्थानी महिला मंडळाची त्रिवार्षिक
सर्वसाधारण सभा पांडव वाड्याजवळ जखिटे भवनात संपन्न झाली. सदर सभेत मंडळाच्या
नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ.सौ.
उज्वला राठी यांची तसेच सचिवपदी सौ.शशिकला पांडे यांची निवड करण्यात आली. सौ मीरा
जखिटे, सौ. गीता काबरा, सौ. पुष्पा बिर्ला, सौ. अनिता काबरा, सौ. स्वाती काबरा, सौ.
भारती बियाणी या सर्वांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात झाली. तसेच
सल्लागार समितीत सौ. मंगला बाहेती व सौ. निर्मला लढे तर सौ प्रियांका जाजू यांची नॉमिनी
म्हणून निवड करण्यात आली. सदर सभेत मावळत्या सचिव सौ स्वाती काबरा यांनी
गतवर्षाच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला. तसेच नव्या कार्यकारणीच्या नेतृत्वात
करण्यात येणाऱ्या कामाचा दिशा निर्देश ठरवण्यात आला. सदर सभेला मंडळाच्या
संस्थापक सदस्य प्रा.सौ. पूनम मानुधने यादेखील उपस्थित होत्या व त्यांनी नवीन
कार्यकारणीला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. नवीन
कार्यकारणीच्या निवडीनंतर सर्व उपस्थित सभासदांनी कार्यकारिणीच्या नव्या सदस्यांना
शुभेच्छा दिल्या.
सदर सभेला_मंडळाच्या सदस्या बहुसंख्येने
उपस्थित होत्या.