आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी जमातीच्या १५० महिला पुरूषांना चोर समजून ताब्यात घेऊन पारधी जमातीला बदनाम करणार्या आळंदी पोलीसांचा निषेध..

0


अमळनेर ( प्रतिनिधि ) ब्रिटिशांनी जात गुन्हेगार ठरवलेला कायदा महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन गृहमंत्री स्व. आबासो, आर.आर.पाटील साहेबांनी सखोल अभ्यास करून रद्द करुन हि, आळंदी वरून वारी जात असतांना, वारी दरम्यान चोरी करतील या संशयाने आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी समाजाच्या महिला, पुरुष, लहान मुले असे १५० जणांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या शोधलं मिडीयावर येत असल्याने पुरोगामी महाराष्ट्रात आळंदी पोलीसांमुळे पारधी जमातीची खूप मोठी बदनामी झाली असून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि ब्रिटिश कालीन कायदा रद्द होऊन हि पुरोगामी महाराष्ट्रात ब्रिटीश वृत्तीच्या पोलीसांनी ब्रिटिश शासन प्रमाणे मानवधीकार कायद्याचे उल्लंघन करीत वारीत चोरी करतील या संशयाने पारधी जमातीच्या १५० जणांना ताब्यात घेतल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण पारधी जमातीच्या भावना दुखावल्या असुन आज रोजी लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीसांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये कार्यवाही करावी यासाठी प्रांताधिकारी सो अमळनेर यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदिवासी विकास मंत्री मा. ना. विजयकुमार गावित साहेब यांना देण्यात आले यावेळी लोक संघर्ष मोर्चा चे विभागीय संघटक पन्नालाल मावळे सह जेष्ठ नेते मधुकर चव्हाण, मोतीलाल चव्हाण, बालीक पवार, अनिल (भुरा) पारधी, विजय (पिंटू) साळूंके, चेतन ठाकूर, गणेश चव्हाण, अक्षय पारधी, नरेंद्र साळूंके, वामन शिंदे सह लोक संघर्ष मोर्चा, पारधी समाजातील कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!