अमळनेर दंगलीतील संशयित आरोपीचा जळगावात उपचार दरम्यान मृत्यू… शहरात तणावपूर्ण शांतता..

0

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर शहरातील दंगल प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी व माजी नगरसेवकाचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख (33, गांधली पुरा, अमळनेर) याचा बुधवारी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच शहरात सायंकाळी दुकाने पटापट बंद होऊन नागरिकांची पळापळ सुरू झाली. पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्याने तणावपूर्ण शांतता होती.

शहरात ९ रोजी रात्री किरकोळ कारणावरून जिनगर गल्ली, सराफ बाजार, सुभाष चौक भागात दगडफेक झाली होती. त्यात सहा पोलिस जखमी झाले होते. रात्रीच पोलिसांनी २९ आरोपींना अटक केली होती. १३ आरोपींना १४ रोजीपर्यंत पोलिस कोठडी तर १८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीत असलेला माजी नगरसेवक सलीम शेख ऊर्फ टोपी यांचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख याची शीतलकुमार सोमवार, १२ रोजी रात्री प्रकृती बिघडल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सराफ होते. बुधवारी सायंकाळी अशपाक याचा मृत्यू झाला.

अशपाक याच्या मृत्यूची माहिती अमळनेर शहरात पोहोचताच सराफ बाजार व सुभाष चौक परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. दुकाने बंद होताच नागरिकांनी धावाधाव सुरू केली.

मयताचे इनकॅमेरा पोस्टमार्टेम

अशपाक याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली. जिल्हा रुग्णालयात पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व एलसीबी पथकाने भेट देऊन इनकॅमेरा पोस्टमार्टम करण्यास परवानगी दिली.

आज बंद !

अमळनेरात शांतता प्रस्थापित व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनेक शाळा, नागरिक, व्यापायांनी गुरुवार, दि. १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

नाईक, सपोनि राकेशसिंग परदेशी व इतर अधिकारी कर्मचारी यांनी दगडी दरवाजा, बाजार, इस्लामपुरा, सराफबाजार, पानखिडकी भागात ध्वनिक्षेपकाद्वारे शांततेचे आवाहन केले, अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून संदेश दिले.

आमदार अनिल पाटील व सामाजिक संघटनांनी शांततेचे आवाहन केले. शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या भागात पोलिस वेगाने मोटारसायकली रिक्षा बंदोबस्त लावण्यात आला होता. घराकडे जाऊ लागल्या होत्या. मात्र जळगावसह इतर विविध ठिकाणाहून डीवायएसपी सुनील नंदवाळकर, जादा बंदोबस्त मागवण्यात आला मारवड पोलिस स्टेशनचे सपोनि आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!