डमंपर ने धडक दिल्याने पुजाऱ्याचा मृत्यू..

अमळनेर(प्रतिनिधि)अमळनेर डंपरने मागून धडक दिल्याने शनी मंदिरावरील पुजाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या फरशी पुलावर घडली. मनोज वासुदेव उपासनी (४७) असे त्यांचे नाव असून ते आपल्या दुचाकी (एमएच०३ / बीजी०९१२) वर दुपारी १:३० वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना मागाहून येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.