डॉक्टर अनिल शिंदे यांनी रक्त चळवळीला दिले मोठे पाठबळ

अमळनेर ( प्रतिनिधि )
14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु अमळनेर येथील एकमेव जीवनश्री ब्लड बँक येथे रक्त तुटवडा जाणवत होता. अनेक रुग्णांना इमर्जन्सी मध्ये रक्त बॅग शोधण्यासाठी धुळे जळगाव येथे जावे लागत होते. डॉक्टर अनिल शिंदे हे स्वतः निष्णात शल्य चिकित्सक असल्यामुळे त्यांनाही रुग्णांचे ऑपरेशन करण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत होता. याच गोष्टीचे सामाजिक भान ठेवून त्यांनी आपल्या नर्मदा फाउंडेशन येथे ब्लड डोनेशन कॅम्प घेण्याचे ठरवले. या कामी 49 महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे कर्नल समीर बोडस यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या एनसीसी च्या विद्यार्थ्यांना व इतर स्टाफ यांना ब्लड डोनेशन करण्यासाठी उस्फूर्त केले. आज 15 जून रोजी नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे 58 अशा विक्रमी ब्लड डोनेशन झाले. यामुळे आगामी एक महिन्यातील रक्ताचा तुटवडा कमी होणार आहे व असंख्य रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल. या कॅम्पमध्ये स्वतः डॉ संदीप जोशी, डॉ खुषवंत भदाने, डॉ गणेश पाटील, डॉ परेश पाटील, प्राचार्य कुणाल पाटील डॉ हर्षल संधांनशिव, प्रशांत जोशी, भाग्यश्री जोशी, पंकज जोंधळे, मोहन कलोसे, डॉ प्रियंका पाटील, डॉ सुरेश खैरनार यांनी सुद्धा रक्तदान केले.
यावेळी डॉ अनिल शिंदे, डॉ संदीप जोशी, डॉ मयुरी जोशी, कर्नल समीर बोडस , सुभेदार मेजर धर्मवीर सिंह , सुभेदार सोन प्रकाश सिंह, हवालदार प्रदीप पंथ , हवालदार विक्रम सिंह यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना नर्मदा मेडिकल फाउंडेशन तर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी माऊली पाॕलटेक्निक चे प्राचार्य कुणाल पाटील , रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे , प्रशांत जोशी, डाॕ. जाकीर शेख , प्रितम पाटील, डॉ परेश पाटील,डाॕ. सुरेश खैरणार , डॉ खुषवंत भदाने, डॉ हर्षल, डॉ प्रियंका, गणेश पाटील व नर्मदा मेडिकल फाँन्डेशन संपूर्ण स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभले. अमळनेर येथील जिवनश्री रक्तपेढीचे संचालक संतोष पाटील व कर्मचारी यांचे ही सहकार्य लाभले