न्यायलयीन कस्टडीत मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल करून व निःपक्ष न्यायलयीन चौकशी करून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला न्याय मिळून द्या… अल्पसंख्यांक विकास व हक्क फाउंडेशन…

अमळनेर ( प्रतिनिधि ) दि ०९ जून २०२३ रोजी अमळनेर येथे लहान मुलांच्या किरकोळ करणावरून दोन गटात वाद निर्माण झाल्याने अमळनेर पो.स्टे येथे गुन्हा दाखल झाला होता. त्या वरून 25 ते 30 लोकांना अटक केली होती यात अमळनेर येथील नगरसेवक सलीम शेख उर्फ (सलीम टोपी) जेष्ठ नागरिक यांचा मुलगा अशपाक शेख सलीम यांना राजकिय द्वेषापोटी काही राजकीय लोकांनी सुळबुद्धी वापरून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयात अडकवले परंतु शहरात वाद झाल्यापूर्वी 20 ते 25 दिवस अगोदर घरातून बाहेर निघतांना घराच्या पायऱ्या वरून पाय सटकल्याने पायाला गुखापत झाल्याने फ्याक्चेर झाले होते म्हणून डॉक्टरांनी पाटा लाऊन पालास्टर करून आराम (bedrest) करण्याचा सल्ला दिला होता पाय फ्याक्चेर झाल्यामुळे चालता येत नव्हते परंतु ९ जुन २०२३ रोजी रात्री १२ ते १ च्या दरम्यान १५ ते २० पोलिस अशपाक शेख च्या घरी आले. तुझे वडील कुठे आहे तो फार मातला आहे त्याला धळा शिकवायाचा आहे. असे सांगण्या वरून अशपाक ने सांगितले कि वडील बाहेर गावी गेले आहे मग पोलिसांनी अशपाक यालाच सांगितले कि तू चाल आमच्या सोबत बोलत बेदम मारहाण केली अशपाक याने ओरडत ओरडत सांगितले कि माझी तब्बेत बरी नाही मला चालता येत नाही मी आजारी आहे मला सोडा असे संगीतले. त्याच्या आई व कुटुंबीयांनी पोलिसांना विनंती हि केली परंतु पोलीसांनी त्यांच्या विनंतीला दुर्लक्ष केले. असे कुटुंबियांचे समक्ष भेट घेऊन हकीकत ऐकून निवेदन वजा तक्रार अर्ज देत आहोत.अशपाकच्या पत्नी व आई ने सांगितले कि पती व मुलास पोलिस कस्टडीत मारहाण झाली आहे या मुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. आहे आई व पत्नी च्या सांगण्या वरून गुन्हा दाखल करुन नी: पक्ष न्यायलयीन चौकशी करण्यात यावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक व कठोर कारवाही करण्यात यावी. तसेच मृत्यूच्या वारसास 25 लाख रुपयाची शासनाकडून मदत जाहीर करण्यात यावी. अशपाक शेख हा 32 वर्षीय तरुण होता ताच्या पश्च्यात पत्नी व 3 लहान मुले वयवृद्ध आई-वडील असे. यांचा संपूर्ण परिवारावर दुखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तो घर चा करता असल्या ने मोठी हानी झाली आहे.
तरी आमच्या भावना शासन स्थरावर कळविण्यात यावे.