अमळनेरात महाराणा प्रताप चौकात विचार यात्रा रथाचे उद्घाटन..

अमळनेर (प्रतिनिधी) :
भारतीय विचार साधना फाउंडेशन पुणे येथून राष्ट्रीय विचारांनी प्रेरित साहित्याचा समाजात जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दि. १३ जून

रोजी मंगळ ग्रह संस्था येथे सचिव दिलीप बहिरम,स हसचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुळकर्णी यांनी उद्घाटन केले.तर दि.१४ जून रोजी महाराणा प्रताप चौकात विचार यात्रा रथाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक कृष्णा पाटील, संघ चालक डॉ चंद्रकांत पाटील, म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, प्रताप महाविद्यालयाचे ग्रँथपाल
दिपक पाटील, प्रा.धिरज वैष्णव यांनी केले.त्यावेळी बालकां पासून ते वृद्धांनी पुस्तके खरेदी केली.
विचार यात्रा यशस्वी होण्यासाठी अमळनेर शहरातील सर्व स्वयंसेवक व राष्ट्रीय विचारसरणीच्या जागृत नागरिकांनी सहकार्य केले.प्रास्ताविक दिनेश पालवे व देवेंद्र तायडे यांनी केले. आभार दिनेश नाईक यांनी मानले. कुणाला पुस्तक पाहिजे असल्यास भारतीय विचार साधना पुणे यांच्या ७६२०३७४८८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
विचार यात्रा रथात उपलब्ध असलेले साहित्य
संघ साहित्य, समरसता,स्त्री शक्ती,कथामाला, ओळख इस्लामची,आपले खेळ,चरित्रे, अर्थकारण, परराष्ट्र नीती, स्वराज्य शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान,शोध श्रीरामांचा,सेवा ग्रामविकास, योग आणि आयुर्वेद, सावरकर साहित्य, आपला इतिहास शिकूया,भाषा प्रबोधन,देशभक्त गीत संग्रह, हिंदुत्व, स्वामी विवेकानंद, एकात्म मानववाद, भारत भारतीपुस्तक माला, लव्ह जिहाद या विषयांवर १५० वेगवेगळ्या प्रकारची १५००च्यावर पुस्तक उपलब्ध होती.