जी.एस.हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा..

अमळनेर (प्रतिनिधि)
शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१५ जून) विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडत होता.यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,जेष्ठ शिक्षक डी.एम.दाभाडे,सी.एस.सोनजे,एस.आर. शिंगाणे, के.पी.पाटील,जेष्ठ लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.