एरंडोल टेनिस क्लब च्या अध्यक्ष पदी अडवोकेट मोहन बी. शुक्ला यांची फेरनिवड..!

एरंडोल (प्रतिनिधि) येथील टेनिस क्लब च्या कार्यकारिणी ची बैठक होऊन पुढील ५वर्षांसाठी अध्यक्षपदी अडवोकेट मोहन बी. शुक्ला यांची तर सचिव म्हणून एन. डी. काळकर यांची फेरनिवड करण्यात आली.यावेळी क्लब चे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर के.ए.बोहरी यांच्या हस्ते पुष्गुच्छ देवुन नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अतुल निंबाजीराव पाटील, प्रा.एम.एस.पाटील, शेखर येवलेकर,डॉ.राजेंद्र देसले,किरण पाटील आदी उपस्थित होते.