गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल मध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा..

एरंडोल (प्रतिनिधी) ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.सर्व विद्यार्थ्याना चॉकलेट वाटप करण्यात आले ,पहिल्या दिवशी सगळ्यात अगोदर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले प्रदीर्घ कालावधीच्या सुट्टीनंतर नविन मित्र , नविन पुस्तके, नविन वर्ग, जुने मित्र व शिक्षिका यांना पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले, माध्यमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. अंजुषा चव्हाण मॅडम व संस्थेचे अध्यक्ष भाऊसो, सचिनजी विसपुते सर तसेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम च्या प्राचार्या सौ. रुपाली जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.