प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिफा क्लिनिक ते हिदायत मस्जिद पर्यंत काँक्रिटीकरणं करणे कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचेहहस्ते संपन्न…

धुळे(अनिस अहेमद) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार

फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे.शहराच्या दक्षिण भागात असलेल्या शिफा क्लिनिक व हिदायत मस्जिद परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी ५० लक्ष चा निधी आ.फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला.सुलतानिया चौक येथे संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.वसिम मेमन, होते यावेळीआ.फारुख शाह यांचे सोबत ,नगरसेवक आमिर पठाण,शोएब मुल्ला,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,डॉ. शराफत अली,आसिफ पोपट शाह,हलीम शमसुद्दिन, मुद्दसर शेख,माजीद पठाण,इरफान शेख,अजहर सैय्यद,अक्तर शेख, हारुण धोबी,यासीन मेमन,अनिस शेख, नईम काझी, नविद शेख,राजा पठाण,सलमान मणियार,नईम मणियार,अल्ताफ शेख,मोहसीन शेख, यांनी केले तर सूत्रसंचालन शोएब मुल्ला यांनी केले..