अंजन शाह दाता सोसायटी चाळीसगाव रोड बोर्डा पासून ते सलीम शेख यांच्या घरा पर्यंत काँक्रिटीकरण व गटार कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

धुळे (अनिस अहेमद) चाळीसगाव रोड अंजनशा दाता सोसायटी, येथे ८० लक्ष रुपयाचे
काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती त्या अनुषंगाने आमदार फारुक शहा यांनी त्या मागणीची तात्काळ दखल घेत नगरोत्थान मध्ये या भागातील रस्ते साठी ८० लक्ष रुपये मंजूर करून घेतले व आज आमदार साहेबांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले या परिसरात अनेक कॉलनी असून अंजनशा दाता सोसायटी चा रस्ता हा मुख्य रस्ता होता चाळीसगाव रोड पासून ते हुडको पर्यंत जोडणारा आहे. तसेच

गजानन कॉलनी हुडको व अविष्कार कॉलनी तसेच अनेक कॉलनी जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या भागातील नागरिकांनी अनेक आमदार निवडून दिले परंतु आज पर्यंत कोणीच या भागाचा विकास केलेला नव्हता परंतु आमदार फारुक शाह यांच्या धुळे शहराचा विकासाच्या ध्यास बघता या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे आमदार फारुक शहा यांच्याकडे या भागातील समस्या मांडल्या होत्या त्याला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुक शाह यांनी ८० लक्ष रुपयांचा रस्ता मंजूर करून घेतला.
धुळे शहरातील रस्त्यांच्या बाबतीत कोणत्याच आमदारांनी गंभीरपणे विचार केला नव्हता परंतु आमदार फारुक शाह यांनी धुळे शहरातील प्रमुख महामार्गाला लागून असलेल्या रस्ते तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शेकडो कोटीच्या निधी आज शहरवासीयांना उपलब्ध करून दिलेला आहे. जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका आमदार फारुक शाह यांची राहिलेली आहे, त्यामुळे शहरातील शहरातील सर्व भागातील रस्ते चकाचक होऊन गेलेले आहे धर्मांध शक्तींशी लढताना फक्त विकासाने उत्तर देण्याचे काम आमदार फारुक शाह करीत असून त्याचीच एक फलनिष्पत्ती म्हणजे आजच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ .भविष्यात अशा अनेक विकासाचे कामाचे ध्येय आमदार फारुक शहा यांच्या मनात आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी आमदार फारूक शाह यांचे आभार मानून सत्कार केला या वेळेस नगरसेवक आमिर पठाण,प्यारेलाल पिंजारी,शोएब मुल्ला,आसिफ पोपट शाह, हालीम शमसुद्दिन ,माजीद पठाण,जमील खाटीक,हाजी मसूद शेख,सलीम शेख, शब्बीर शेख,अजहर सय्यद,फरीद शेख,हसन पठाण, नजर पठाण,दबीर शेख,शौकत पठाण,जहांगीर शेख,अरमान पिंजारी, मुक्तार शाह,मामाजी खत्री, मुस्तकीन शेख,अमीन शेख,सलमान अन्सारी,शाहरुख शाह सुत्रसंचालन इकबाल तेली यांनी केले.