आंतरराष्ट्रीय चिखल दिवस साजरा.. साजरा.. International Mud Day.

एरंडोल ( प्रतिनिधी )
आज रोजी दिनांक १७.०६.२०२३ पोदार प्रेप मध्ये आंतरराष्ट्रीय चिखल दिवस साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने क्रियाकलाप करून घेतेले.
यात विद्यार्थ्यांनी विविध मातीच्या वस्तु, मुखवटे बनविले, विविध प्रकारच्या रंगानी हाताच्या ठशांनी झाडांचे चित्र बनविले. विद्यार्थ्यांनी मातीचा वापर करत चित्रकाम केले. मातीत खेळणे ही एक प्रकारची उपचार पद्धती आहे हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणले.
International Mud Day celebration चा विषय International Mud day, My family, my buddy” हा होता विद्यार्थ्यांनी घरी जाताना विविध झाडांच्या बिया असलेले चिखलाचे गोळे (SEED BALL) घेऊन गेलेत, जेणेकरून झाडे लावून, जगवून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. गोकुल महाजन सर उपस्थित होते. कार्यक्रमात सौ उमा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले! शिक्षकवृंदांनी कार्यक्रमात सक्रिय योगदान दिले.