राष्ट्रवादी अल्पसंख्याक धुळे शहर उपाध्यक्षपदी सोहेल खान तर सचिवपदी सैय्यद अमिर अली..

धुळे (प्रतिनिधि) धुळे येथील राष्ट्रवादी काँगेस भवन येथे आज दिनांक १७/६/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील

मुस्लिम तरुणांना राष्ट्रवादी काँगेस अल्पसंख्यांक विभागाची पदे वाटप करण्यात आली.
धुळे शहर उपाध्यक्ष पदी सोहेल खान अकबर खान पठाण, धुळे शहर सचिव पदी सय्यद अमिर अली अन्वर अली,धुळे शहर सहसचिव पदी सलमान शाह शकील शाह यांची स्तुत्य निवड करण्यात आली
यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण कार्याध्यक्ष श्री प्रशांत भाऊ भदाने,अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण अध्यक्ष सलीम भाई शेख धुळे,सेवादलाचे अध्यक्ष श्री मंगेश भाऊ जगताप,शहराचे अध्यक्ष जमीर भाई शेख,ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर, यासिर अन्सारी, मोहम्मद साबीर अन्सारी आदि व त्यांच्या समवेत विविध सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रवादी अल्पसंख्याक चे शहर अध्यक्ष जमीर भाई शेख यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे प्रसिध्दी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिद्ध केली..