अमळनेर दंगल प्रकरणी मा. शरद पवार साहेब यांना निवेदन..

रावेर (राहत खाटीक ) गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे सलोख्याचे वातावरण खराब करण्याचे कारस्थान सुरु आहे अशी शंका येन्याइतपत काही वाईट घटना जिल्ह्यात सुरु आहेत. त्यातील एक दुःखद

घटना म्हणजे अमळनेर येथे उसळलेली दंगल व एका संशयीत आरोपीचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यु; या सर्व प्रकरणांचा निष्पक्ष पद्धतीने तपास करून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या उद्देशाने जिल्ह्याभरातील सामाजीक कार्यकर्ते,संघटना निरंतर पाठपुरावा करत आहेत,त्यात पोलिस दल असो कि राजकीय पक्ष.
याच अनुशंगाने आज ज्येष्ठ नेते मा.शरद पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले.त्यात अमळनेर शहरात उसळ लेली दंगल व त्या मागची खरी पार्श्वभूमी याबद्दल साहेबांना माहिती देण्यात आली व याविषयी मुख्यमंत्री व इतर अधिकारी वर्ग यांना योग्य त्या सुचना देऊन परिस्थिती हाताळन्यास सांगावे अशी विनंती करण्यात आली.
निवेदन देतांना लोकसंघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, अब्दुल करीम सालार, अज़ीज़ भाई सालार, फ़ारूक़ भाई क़ादरी, राष्ट्रवादीचे एजाज़ मलिक,शेख सलीम चूड़ीवाले, इरफान मेम्बर हयात खान शकील जनाब असलम खान आणी अमलनेर,चीनावल, सावदा , भूसावल चे लोक हजर होते.