अमळनेर कुर्षि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वाराला बळीराजा प्रवेश द्वार नामकरण..

0

अमळनेर( प्रतिनिधि) येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे भव्य स्वागत सत्कार बाजार समिती सभापती, उपसभापती संचालक यांच्या हस्ते करण्यात आला.खा.शरद पवार यांना बळीराजाची प्रतिमा

भेट देत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वाराचे बळीराजा प्रवेशद्वार नामकरण यावेळी झाल्याचे जाहिर करण्यात आले. बाजार समितीचा यानिमित्ताने कायापालट करण्यात आला आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचे रंगकाम व सुशोभीकरणासह मोठ्या प्रमाणावर परिसर स्वच्छता करण्यात आली होती तर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात येऊन प्रवेश द्वाराला बळीराजा प्रवेशद्वार असे नामकरण खा.शरद पवार यांना सभापती अशोक आधार पाटील उपसभापती सुरेश पाटील, समाधान धनगर यांचे सह संचालक मंडळाच्यावतीने बळीराजाची प्रतिमा भेट देत प्रवेशद्वाराचे नामकरण जाहीर करण्यात आले.यावेळी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, आ.अनिल पाटील ,जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे यांचे उपस्थितीत
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक डॉ अनिल शिंदे, डॉ.अशोक पाटील, समाधान धनगर,प्रा. सुभाष पाटील, भोजमल पाटील, सौ पुष्पा पाटील,सौ सुषमा देसले, भाईदास अहिरे, व्यापारी असोसिएशनचे हरी भिका वाणी रमेश छाजेड संचालक प्रकाश वाणी अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील आदींनीही एकत्रित पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार , माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी मंत्री डॉ.सतिश पाटील,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचेसह मान्यवरांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गाडी थांबवून पदाधिकारी यांचेशी चर्चा करून धावती भेट दिली.
यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात पारंपारिक वाद्यांवर नृत्य सादर करून लक्ष वेधून घेतलेले होते. तर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मान्यवर नेत्यांचे स्वागत व सत्कार उपस्थित बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी, संचालक मंडळाने , हमाल, मापाडी कामगार संघटना, खरेदीदार व्यापारी असोसिएशन,आडत असोसिएशन, गुमास्ता कामगार संघटना बाजार यांचे पदाधिकाऱ्यांसह समितीचे सचिव डॉ.उन्मेष राठोड, सुनिल सोनवणे,अशोक वाघ,योगेश महाजन, गणेश पाटील, धिरज ब्रह्मे, निलेश पाटील, प्रशांत राणे,योगेश इंगळे,बापू पाटील,प्रशांत पाटील,सुरेश शिरसाठ,आबा गोसावी यांचेसह मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!