राष्ट्रवादीच्या सभेत चोरांची जत्रा ४६ जणांचे पाकीट मारले.

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर येथे राष्ट्रवादी च्या कार्यक्रमाच्या वेळी चोरांनी हातसफाई करीत ४६ जणांचे पाकीट चोरले धुळे ,शिरपूर ,मालेगाव चे चार जण अटकेत अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोड शो आणि कार्यक्रमाच्या गर्दीत धुळे , मालेगाव ,शिरपूर येथील चार चोरट्यानी ४६ जणांचे पैसे, पाकीट ,मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले असून चारही आरोपीना अटक करण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेत आरोपी समीर शहा सलीम शहा वय २२ रा रामदेवबाबा नगर धुळे , हमीदअली मोहम्मदली उमर वय ४२ रा रोशनबाग मालेगाव ,उमर फारुख शेख लतीफ वय २२ रा आझाद नगर मालेगाव , भैया विक्रम खैरनार वय ३८ रा बालाजी नगर शिरपूर या चौघांनी १६ रोजी दुपारी अशोक गोकुळ पाटील ,मंगरूळ , प्रेमराज धनराज पाटील सुंदरपट्टी , मंगेश भगवान पवार रा पातोंडा , मनोज भारत पाटील रा खडके , अनिल भटू पाटील सानेनगर , दीपक सुरेश पाटील ,रा सानेनगर, शेख अशपाक अब्दुल खलील, खडका रोड भुसावळ , ज्ञानेश्वर शामराव पाटील रा खेडी , भगवान पितांवर पाटील कामतवाडी , प्रितेश भगवान पाटील रा गडखांब , साईदास जंगलू वंजारी रा रामेश्वर ,कल्पेश माधवराव पाटील रा शिरूड , शेख सलीम शेख फत्तु रा कसाली मोहल्ला , भगवान ज्ञानदेव वळवी रा नांदुरा जि बुलढाणा , विठ्ठल शंकर जाधव रा नागझर वाडी ,धाराशिव , भागवत साहेबराव पाटील रा मंगरूळ , देविदास भाऊराव पाटील रा दहिवद , सुभाष अशोक खैरनार लोंढवे , निरंक सुभाष पाटील रा मंगरूळ यांच्या खिशातील मोबाईल तर धनराज पितांबर पवार रुंधटी , संदेश गंभीर पाटील रा ढेकू , परेश शरद सोनवणे , अमळनेर ,नेताजी वसंतराव पाटील जवखेडा , योगराज राजेश संदानशीव रा प्रबुद्ध कॉलनी , अप्पा मोतीराम बागले रा पैलाड , सुभाष आत्माराम पाटील रा अमळनेर , दिनेश प्रेमराज पाटील पिंपळे , मिलिंद प्रभाकर पाटील रा शिरूड , संजय वसाराम वंजारी रा रामेश्वर खुर्द , युवराज शांताराम पाटील रा तांबेपुरा , संभाजी हिम्मत पाटील रा तरवाडे , सखाराम रंगराव पाटील रा पिंपळकोठा ,पारोळा , हरीलाल महादू पाटील रा पिंपळे , ज्ञानेश्वर नगराज पाटील रा टाकरखेडा , भागवत युवराज पाटील रा रामेश्वर , रामराव मालजी पाटील रामेश्वर , नाना शामराव पाटील सानेनगर , कृष्णा सखाराम कोळी बोहरा , नारायण लहू पाटील खडके , अशोक शाळीग्राम पाटील रा लोंढवे , शेषराव दयाराम पाटील रा झाडी , मनोहर अभिमन पाटील ढेकू रोड , प्रताप दगडू पारधी आमोदे , सुभाष महादू पाटील पिंपरी ता पाचोरा , गिरीश दिनकर पाटील रा भवरखेडा धरणगाव ,उमेश नारायण पाटील रा कन्हेरे यांच्या खिश्यातील पैसे आणि गौरव उदय पाटील यांच्या खिशातील १९ हजार ५०० रुपये चोरन घेतले आहेत. पोलिसांना गर्दीत वरील चारही आरोपी चोरी करताना सापडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.