अमळनेर येथे राष्टरवादी काँग्रेस तर्फे शक्ती प्रदर्शन …… रोड शोला नागरिकांची गर्दी..

0

अमळनेर (प्रतिनिधि) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि आमदार अनिल पाटील साहेबराव दादा यांनी शहरात रोड शो करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन केले. मिरवणुकीच्या मागे खा. शरद पवार आणि एकनाथराव खडसे चारचाकीमधून येत होते. आमदार अनिल पाटील यांच्या बंगल्यापासून खुल्या जिप वर बसून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या पुढे मोटरसायकल रॅली, महिलांचे ढोल पथक, त्यांच्यामागे वारकरी पथक होते. शरद पवार आगे बढो, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, एकच वादा अजित दादा, जयंत पाटील आगे बढो, एकच वादा अनिल दादा आदी घोषणा देण्यात आल्या. रोड शोमुळे अमळनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची मरगळ झटकली जावून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मिरवणूक अरिहंत चौक, तहसील कार्यालय, महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ पोहचली. शरद पवार यांना पाहण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!