पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘जी-20 जनभागीदारी योजनेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन !

0

एरंडोल (प्रतिनिधी)

१ ते १५ जुन या कालावधीत केंद्रीय विद्यालय संगठन द्वारा नियोजित सर्व केंद्रीय विद्यालय तसेच सी बी एस ई शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण तसेच G-20 च्या संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी व शिक्षक यांच्या सक्रीय भागीदारीतून हा कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात आला.

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले होते.यावर्षी जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे .जी-20 परिषदेसंदर्भात माहिती देण्यासाठी आणि त्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी “मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान” (FLN)” या थिम अंतर्गत अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत दि.२ जुन रोजी ई. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यात स्नेहा गाडेकर प्रथम,योषा गांधी द्वितीय तर नक्षत्रा बढे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषावर मनीषा पाटील यांचे शिक्षकांच्या उपस्थितीत व्याख्यान ३ जुन रोजी आयोजित केले होते.

४ जुन ला ई.१ ली ते सातवी च्या विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयावर आधारित व्हिडीओचित्रण प्रक्षेपित करण्यात आले .

५ जुन रोजी सौ.पूनम खरात यांनी शिक्षकांना संबोधित करतांना मनोरंजनातून शिक्षण ही संकल्पना विस्तृतपणे मांडली.

ई.८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी जी-20 परिषदेत भारताचे अध्यक्षपद या विषयावर प्रश्नमंजुषा ६ जुन ला आयोजित करण्यात आली.सहभागी एकूण ११९ स्पर्धकांमधून यश चौधरी प्रथम,प्रसन्ना खिरले द्वितीय व गुंजन भोसले त्रितीय स्थानी होते.

गुगल मिट च्या माधमातून विद्यार्थ्यांसाठी ‘माझ्या स्वप्नातील भारत” या विषयावर कथालेखन स्पर्धा ७-जुन रोजी घेण्यात आली.त्यात प्रणाली चव्हाण ,अपूर्वा जाखेटे व चिन्मयी बोरोले ह्या अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय स्थानावर होत्या.

८-जुन रोजी श्री विवेक सोहनी यांनी गुगल मिट च्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

९-जुन- ई.१ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील शिक्षण व्यवस्थेचे भविष्य’या विषयावर खुल्या वक्तृत्व स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.यावेळी शिवम बोरकर प्रथम तर हर्षदा पाटील व अथर्व पाठक हे दुसऱ्या व तिसर्या क्रमांकावर होते.
१०- जुन रोजी प्रभात फेरीच्या आयोजनाचा विषय’ साक्षरता प्रसार व शिक्षणाचे महत्व’ असा होता.एकूण १५५ विद्यार्थी व १५ शिक्षकांनी शाळे जवळील रहिवासी वस्तीत जावून उपक्रम राबविला.

११ जुन विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांसाठी राखीव ठेवत क्रिकेट आणि फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले.शिक्षणासोबत खेळ देखील तितकेच महत्वाचे आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य साधनांचा समावेश असलेले उपक्रम १२ जुन आणि १३जुन रोजी घेण्यात आले.यात वेगवेगळ्या गटातून एकूण ८०० विद्यार्थी उपस्थित होते.
१४ जुन रोजी पपेट शो कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले. पाक्षिक कार्यक्रमाचा समारोप दि.१५ जुन रोजी करण्यात आला.
पोदार स्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरीत करीत असताना त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या फ्लॅग प्रोग्राम मध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होता आले या गोष्टीचा आवर्जून उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य श्री दीपक भावसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!