भागवत रोड येथील कलाश्री क्राफ्ट दुकान जळून खाक..

अमळनेर (प्रतिनिधि) येथील भागवत रोड वरील कलाश्री क्राफ्टच्या दोन दुकानांना 18 रोजी पहाटे आग लागून दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
भारती गाला यांच्या दुकानाला

पहाटे आग लागल्याची माहिती संतोष पाटील यांनी दिली. आगीची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ज्याना कळवताच त्यांनी अग्निशमन दलाचे दोन बंब पाठवले. नितीन खैरनार, फारूख शेख, जफर खान, दिनेश बिऱ्हाडे, मच्छिंद्र चौधरी, आनंदा झिम्बल यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे अडीच तास आग विझवायला लागले. आगीत दुकानातील सर्व वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवली नसती तर रसमंजू शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील कपड्याच्या व इतर दुकानाना आग लागून नुकसान झाले असते. पोलिसात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.