एम एम एन एफ चे स्तुत्य उपक्रम
जळगावात व्यापार कार्यशाळा संपन्न..

जळगाव (प्रतिनिधि) शहरात प्रथमच महाराष्ट्र मायोनिरिटी एनजिओ फोरम (एमएमएनएफ) मुंबई व अलखैर ट्रस्ट जळगाव च्या माध्यमाने व पिंच बॉटेलिंग जळगाव पुरस्कृत खान्देश स्तरीय प्रथम व्यापार कार्यशाळेचे आयोजन ईदगाह हॉल मध्ये करण्यात आले
होते.
या एक दिवसीय कार्यशाळेत (सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत) जळगाव, धुळे व नंदुरबार येथील २०० नवीन उद्योजकांची उपस्थिती होती.

या कार्य शाळेचे अध्यक्षस्थानी मुफ्ती हारून नदवी तर स्वागत अध्यक्ष पदी फारूक शेख होते.
प्रमुख मार्गदर्शक एम एम एन एफ चे संस्थापक अध्यक्ष झाकीर सिकलगर होते.
वक्ते व विषय
१)व्यापाराचे वैशिष्ट्ये व संशोधन -झाकीर सिकलगर
२)मिशन टेकनोबीझ अँड स्कूलिंग पायलट प्रोजेक्ट – इफतेखार पटेल (उस्मानाबाद)
३)”यशस्वी उद्योजकाची वैशिष्ट्ये – साजिद पटेल( शिरपूर)
४)यशस्वी उद्योगा साठी लागणारे बुद्धिमत्ता – जफर शेख(पिंच बोटलिंग, जळगाव)
५) कॉर्पोरेट ऍन्ड फ्रॅंचायजी बीसीनेज – यासिन शेख (सोलापूर)
६) बिन व्याजी कर्ज अर्थ पुरवठा – माजीद शेख (मुंबई)
७)नौकरी व व्यवसाय कसे करावे – काझी मखदुम (बीड)
८)राजकारण व समाज कारण मधील उद्योजक – एजाज मलिक ( जळगाव)
९) शासकीय औद्योगिक योजना, कर्ज माहिती – जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक जळगाव
१०) अध्यक्षीय भाषण -मुफ्ती हारून नदवी ( जळगाव)
या कार्य शाळेचे महत्व व उद्देश माजी विद्यापीठ रजिस्ट्रार काझी रफिक यांनी विशद केले.
स्वागत अध्यक्ष फारूक शेख यांनी जळगाव मधील अल्पसंख्याक समाजात उद्योजकासाठी लागणारी क्षमता असल्याने कार्यक्रम घेण्याचे महत्व विषद केले.
कार्य शाळेचे सूत्र संचलन अहेसान सैयद (वरणगाव) यांनी तर आभार युसूफ शाह यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी जमील शेख,फहिम पटेल,अडव्होकेट आमिर शेख,सरफराज इनामदार,आसिफ देशपांडे,अदनान,सैयद इस्माइल यांनी परिश्रम घेतले.
फोटो
१) व्यासपीठावर मार्गदर्शन करतांना झाकीर सिकलगर
२) उपस्थित उद्योजक