ASI निंबा शिंदे यांच्या ततप्रतेने मिळाले २,७५,००० रू.

“वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, यांची दमदार पोलीस टीम
अमळनेर (प्रतिनिधि) आज रोजी दुपारी, बस मधून उतरत असतांना एक महीला प्रवाशी हीची पैशाची बॅग तिच्याकडे नसल्याचे तीच्या लक्षात आले.
तीने लागलीच बस स्टँड ड्युटीवरील ASI नींबा शिंदे यांना बॅगचे वर्णन ओरडून सांगीतले.
नींबा शिंदे यांनी लागलीच, त्या बसमधून उतरून चालू लागलेल्या प्रवाशांकडे त्वरेने पळापळ करून शोध घेतला.
तेव्हा एका प्रवाशाकडे ती मिळून आली. त्यात 2,75,000/- रु. होते.
त्या प्रवाशाने त्याच्या बॅगसारखीच असल्याने ती अनवधानाने स्वतःची समजून त्याच्या ईतर बॅगसोबत घाईगडबडीत उचलून सोबत घेतली होती.
कष्टाचे पैसे परत मिळाल्याने सदर महिला अत्यंत आनंदीत झाली.
यापूर्वीही त्यांनी ड्युटीस कायम हजर राहून प्रवाशांना सतत अशीच मदत केली आहे.