कुरियरने तलवार मागवणाऱ्या गांधलीपुरा भागातील पिता पुत्राच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

0

अमळनेर (प्रतिनिधि)
शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेडकॉन्स्टेबल शरद पाटील ,रवींद्र पाटील ,दीपक माळी , सिद्धांत शिसोदे , याना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावली. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्टेशन रोड कडून मोटरसायकल क्रमांक एम एच १५ जी क्यू ५९०४ वर अदनान सादिक खाटीक वय १९ रा मिलन चिकन ,लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा हा पांढऱ्या गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला. त्याला विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक वय ४७ यांच्या नावाने तलवार मागवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी साठी पोलिसांनी अदनान याची मोटरसायकल आणि भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख १२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!