अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी मोहन सातपुते तर उपाध्यक्षपदी प्रदीप अग्रवाल बिनविरोध..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मोहन बाळाजी सातपुते, तर उपाध्यक्षपदी प्रदीप कुंदनलाल अग्रवाल यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा पार पडली. यावेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध जाहीर केली. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. सभेला संचालक प्रवीण जैन, पंडित चौधरी, दीपक साळी, पंकज मुंदडा, प्रदीप अग्रवाल, भरत ललवाणी, अभिषेक पाटील, लक्ष्मण महाजन वसुंधरा लांडगे, डॉ. मनीषा लाठी,
रणजित शिंदे उपस्थित होते. खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अमृत पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक मंडळाच्यावतीने पंडित चौधरी यांनी बँकेचा विकास, कर्मचारी व सभासद यांचे हित जोपासले जाईल, अशी ग्वाही दिली. कुंदनलाल अग्रवाल, बजरंग अग्रवाल, विनोद पाटील, योगेश मुंदडा, हरी वाणी, डॉ. संदेश गजराथी आदी उपस्थित होते…