सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब शोध..
१०० मीटरच्या अंतरावर २ किलोमीटर चा फरक..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल ते कासोदा रस्त्यावर वरील कासोदा कडून एरंडोल कडे येतांना म्हसावद व उत्राण फाट्यावर अंतर दर्शविणार्या फलकावर १०० मीटरच्या अंतरावर एका फलकावर एरंडोल ३ किलोमीटर तर त्या पूढे किलोमीटर दर्शवणारा दगडावर एरंडोल १ किलोमीटर दर्शविला आहे. त्यामूळे त्या रस्त्यावर नविन जाणारा माणूस संभ्रमात पडतो की एरंडोल नक्की किती किलोमीटर ?
एरंडोल कासोदा रस्त्याचे काम होऊन दोन वर्ष लोटली परंतु अजूनही कासोदा कडे जातांना नगरपालिकेच्या उद्याना जवळ एक रस्ता कासोदा कडे तर दुसरीकडे जूना पारोळा रस्ता असून त्या टी पाॅंईट वर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. जून्या पारोळा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. त्यामूळे अधिकारींना अशी जाणीव झाली की हा रस्ता कुठे जाणार आहे हे वापर करणार्यांना सर्वांना माहीत आहे.त्या टी पाॅंईट वरील दुकानदार आपला व्यवसाय सांभाळून लोकांना रस्त्या विषयी जाणीव करून देत आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन दिशादर्शक फलक लावण्यात येईल. अशी अपेक्षा वाहनधारक करीत आहेत.