गुरांच्या अवैध वाहतुकीवर एरंडोल पोलिसांची कारवाई, ४ बैलांसह वाहन जप्त..!

एरंडोल ( प्रतिनिधि ) येथे धरणगाव हाय-वे चौफुली वर कर्तव्यावर असतांना पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत प्रकाश पाटील यांना पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या मंगल कार्यालयापुढे काही अंतरावर २० हजार रूपये किमतीच्या ४बैलांची अवैध वाहतुक करणार्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप ला २०जून २०२३ रोजी मंगळवारी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
एम.एच.४८ टी.३२१३ क्रमांकाचे महिंद्रा पिकअप वाहन ४ मावी जातीच्या बैलांना निर्दयीपणे दोरांच्या सहाय्याने बांधून कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने धरणगावकडे जात असताना मिळून आले.यावेळी हाय-वे चौफुलीवर नाकाबंदीला असलेले पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील यांनी सदरील वाहनास रंगेहाथ पकडले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला भाग६ गु.र.नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुुधारणा) अधीनियम १९९५ चे कलम ५अ(१)प्रमाणे प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रायव्हर व क्लिनर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.