पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीस २ दिवसांची न्यायालयीन कोठडी..!

एरंडोल (प्रतिनिधि) येथे गांधीपुरा भागातील वखार गल्लीत पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याप्रकरणी किरण मराठे यास एरंडोल न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हर्षदा किरण मराठे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव असून सोमवारी या दाम्पत्यातील वाद प्रचंड विकोपाला गेल्याने संतप्त पतीने पत्नी हर्षदाच्या डोक्यात ओट्यावरील फरशी टाकली. यात फरशीचा घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.
पोलिसांनी लागलीच संशयित आरोपीस ताब्यात घेतले होते.
या प्रकरणी ची सुनावणी आज दुपारी एरंडोल न्यायालयात झाली असता न्यायालयाने सरकार पक्षाचा व बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी किरण महादू मराठे यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यावेळी सरकार पक्षातर्फे ऍड.सुरडकर तर आरोपी पक्षा तर्फे ऍड.रमेश दाभाडे यांनी काम पाहिले.