“सर”अजून किती लोकांचा बळी घेणार आपला जलतरण तलाव- संघटनेचे सचिव फारुक शेख यांची आर्त हाक..

जळगाव ( प्रतिनिधि)
दिनांक १८ जून रोजी संध्याकाळी क्रीडा संकुलातील जलतरण तलावात २३ वर्षीय अशपाक बागवान हा तरुण बुडून मृत्यू पावला असून यापूर्वी सुद्धा दोन तरुणांचा जीव गेलेला आहे. शासनाने सदर जलतरण तलावाची खोली कमी करण्याचे आदेश देऊन सुद्धा ९ वर्षात ते काम न झाल्याने हा ३रा जीव गेलेला आहे, अजून किती जीव घेणार ? त्यानंतरच जलतरण तलावात सुधारणा होईल अशी आर्तहाक जळगाव जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष क्रीडा संकुल समिती अमन मित्तल यांना प्रत्यक्ष भेटून केली.
या भेटीत त्यांनी ९ मागण्याबाबत चौकशी करण्याची विनंती केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तातडीने भेट
२ वाजता तक्रार ऐकून घेतल्यावर ३.३० वाजता जिल्हा अधिकारी अमन मित्तल हे स्वतः जलतरण तलावावर येऊन त्यांनी प्रत्यक्ष तलावाची पाहणी केली व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांना ९ मागण्या बाबत बैठक लावण्याचे आदेश दिले.
सदर बैठकीत जिल्हा

क्रीडा अधिकारी, तहसीलदार पोलीस अधिकारी व संघटनेतर्फे फारुक शेख यांच्या उपस्थित सभा घेण्याचे आदेश दिले.
९ मागण्या ची तक्रार
१)जलतरण तलावाची खोली ४ ते ७ फूट इतकीच असावी हा नियम असताना तसेच २०१२ च्या मृत्यूनंतर समितीने सदर खोली त्वरित ५ फूट करण्याची आदेश दिले असताना सुद्धा ९ वर्षात खोली का कमी करण्यात आली नाही?
२) जलतरण तलावात जीव रक्षक यांची नियुक्ती कायद्यानुसार व परिपत्रकानुसार आहे का?
३) तलावातील पाण्याची पातळी, त्यातील क्लोरीन ची मात्रा, याची नियमानुसार तपासणी होते का?
४)तलावावर येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले असतात का?
५) जलतरण तलावावर रोज येणारे कडून क्रीडा संकुलाची फी का वसूल केली जात नाही?
६) जलतरण तलावाचा ठेका क्रीडा संघटना, जलतरण संघटना अथवा जलतरण संस्थेला द्यावयाचे असताना ठेका एका वैयक्तिक माणसांच्या नावे कोणत्या आधारे दिला गेला ?
७) जलतरण तलावाचा ठेक्याची मुदत ३१ मार्च २०२३ ला संपली असताना नवीन टेंडर न काढता ठेकेदाराला कशाच्या आधारे नूतनीकरण करून देण्यात आले?
८) जलतरण तलावात आवश्यक त्या उपाययोजना त्यात प्रामुख्याने फ्लोट, ट्यूब इत्यादी वस्तू का उपलब्ध नाही?
९) तलावा वर खोलीची पातळी दर्शविणारे चिन्ह (आकडे) का नमूद नाही?
या सर्व ९ मुद्द्यांबाबत जो कोणी प्रशासकीय अथवा व्यवस्थापकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असेल त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.
या तक्रारीची प्रत क्रीडामंत्री गिरीश महाजन व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवा सेवा संचालनालयाचे आयुक्त यांना सुद्धा देण्यात आली आहे.