पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘ ९ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस” उत्साहात साजरा !

एरंडोल ( प्रतिनिधी)
५००० वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगमहर्षि पतंजली यांच्या अमूल्य शिकवणीच्या सन्मानार्थ २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून भारतासह १९० देशांमध्ये साजरा केला जातो.
या दिवसाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या कु.निकिता पाटील व कु. गीता पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपप्राचार्य श्री दीपक भावसार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.मा.डॉ.सुधीर शहा या प्रसंगी प्रमुख पाहुणे तर कु.दिपाली देशमुख ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच महर्षि पतंजली ह्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.शाळेच्या समन्वयिका सौ.मेघना राजकोटिया यांनी सूत्रसंचालन केले.
शाळेचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी या प्रसंगी ९ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व ‘वसुधैव कुटुम्बकम ’ या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या आशयाला अनुसरून विद्यार्थी व पालकांना योगाभ्यास करण्याचे विनम्र आवाहन केले. योगा च्या दैनंदिन जीवनातील उपयोगितेबद्दल सर्वसमावेशक अशी माहिती विषद केली .
याप्रसंगी विशेष अतिथी योग प्रशिक्षिका व आहारतज्ञ कु. दिपाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगिक आसने, सूर्यनमस्कार, संतुलित आहार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
ई.८ वी व १० वी च्या समूहाने योगा नृत्य सादर केले. मानव अडवाणी या विद्यार्थ्याने योगक्रिये मुळे होणाऱ्या विविध फायद्यांची जाणीव यावेळी आपल्या भाषणातून करून दिली. योग आणि प्राणायाम करून शरीर व मन निरोगी ठेवा ह्या अशयाला अनुसुरून एक लघुनाटिका यावेळी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केली.
या प्रसंगाचे औचित्य साधत ई.१० वी व १२ वी बोर्डात शाळेतून नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पालकांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सुधीर शहा यांनी विद्यार्थी मित्रांना मन आणि शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच आत्मविश्वास ,सकारात्मकता वाढविण्यासाठी योगा केलाच पाहिजे असे आवाहन केले. प्रदूषण नियंत्रण ही काळाची गरज आहे व प्रत्येकाने यात आपला सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे असे मत मांडले.
शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या ह्या कार्याक्रामादरम्यान सुमारे १००० विद्यार्थ्यांनी शाळेच्या योगशिक्षिका कु.स्नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार ,योगासने व प्राणायाम करत लाभ घेतला.
पोदार स्कूलचे उपप्राचार्य श्री दीपक भावसार ,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन उन्नती महाजन व मानसी काबरा या विद्यार्थीनिनी केले.