संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा..

सोयगाव (साईदास पवार) येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या

संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
योग शिक्षक विवेक जोशी यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार हे अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. प्रदीप गोल्हारे यांनी केले तर आभार डॉ निलेश गाडेकर यांनी मानले. या योग शिबिरासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ निलेश गावडे व डॉ पंकज गावित, श्री सुनील वाघ, भरत औरंगे यांनी परिश्रम घेतले.