तालुका शेतकी संघातर्फे रब्बी हंगाम भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन…

अमळनेर( प्रतिनिधि)राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत तालुका शेतकी संघातर्फे रब्बी हंगाम भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी जिप सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ अनिल शिंदे, उपसभापती सुरेश पिरन पाटील, नितीन बापूराव पाटील, विजय पाटील तहसील कार्यालयाचे गोदाम व्यवस्थापक अनिल पाटील, देविदास देसले, प्रविण गोसावी, राहुल गोत्राल, शेतकी संघाचे प्रशासक व्हि एम जगताप सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सुनील महाजन ,व्यवस्थापक संजय पाटील, बाजार समिती सचिव उन्मेश राठोड कर्मचारी सुनिल पाटील,योगेश महाजन,डिंगम्बर पाटील, प्रशांत पाटील, वाघ शेतकी संघाचे कर्मचारी अरुण पाटील,शिवाजी मोरे ,ऑपरेटर विवेक पवार, भिकन पवार हजर होते.
पहिले शेतकरी तालुक्यातील जुनोने येथील दिनेश पंडित पाटील यांचा माल मोजण्यात आला. त्यांचा सत्कार करण्यात आला.