महात्मा फुले हायस्कूल येथे दोनशे विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप..

एरंडोल (प्रतिनिधि) महात्मा फुले हायस्कूल येथील दोनशे हूशार व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन होते.सदर कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन अरुणकुमार माळी,जयराम माळी हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हूशार व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. या वेळी नवीन दप्तर मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत झाले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.