श्रीक्षेत्र सुकेश्वर दिंडीचा पंढरपूर येथे महाद्वारात हरिनामाचा उत्स्फूर्तपणे गजर..

0

एरंडोल (प्रतिनिधि) श्रीक्षेत्र सुकेश्वर येथून एक जून रोजी प्रस्थान झाल्यावर विविध जिल्ह्यातील भाविकांकडून उत्साहात स्वागत व ज्ञानोबा तुकाराम नामाच्या गजरात दिंडी यंदा ५० वे वर्षी २३ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात पोहोचली या दिंडीचे नेतृत्व सुकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विजय भामरे व मार्गदर्शक रमेश दुसाने हे होते संत नामदेव पायरी जवळ महाद्वारात सर्व वारकरी भाविक भक्तांनी हरिनामाचा उत्स्फूर्तपणे गजर करीत महाराष्ट्र सुप्रसिद्ध पारंपारिक फुगड्यांचा आनंद घेतला.
यंदा दिंडी त ७५ वारकरी सहभागी झाले दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ८८ वर्षाचे विणेकरी मधुकर महाराज तावसेकर यांनी पायी वारी केली ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प भागवत महाराज शिरसोली कर ह भ प विशाल महाराज संजय महाराज कृष्णा महाराज योगेश महाराज रामकृष्ण महाराज हनुमंतखेडेकर वैभव महाराज यांनी दिंडीत सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!