समान नागरी कायद्याला मुस्लिम समाजाचा आक्षेप..

0

१३ जुलै पर्यंत हजारोच्या संख्येने आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधि ) सरकार समोर प्रस्तावित समान नागरी संहितेची रूपरेषा असे सुचवते की ते शरिया व कौटुंबिक कायद्याशी अनेक बाबतीत विरोधाभास करत असल्यामुळे आम्हा मुस्लिमांना ते धार्मिक दृ

ष्टिकोनातून पूर्णपणे अस्वीकार्य आहे शिवाय ते देशाच्या हिताचे नाही कारण भारत हा विविध धर्म आणि विविध परंपरांचा संग्रह आहे आणि ही विविधता हेच त्याचे सौंदर्य आहे. ही विविधता नष्ट करून त्यांच्यावर एकच कायदा लादला गेला तर त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे हे देखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या व्यक्तीक कायद्याला धक्का लागणार नाही या एकाच आश्वासनावर सरकारने विविध फुटीरतावादी जमातींना राष्ट्रीय प्रवाहात सामावून घेतले आहे. गटांच्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करणे अनावश्यक आहे आणि हाच घटनेचा आत्मा आहे त्यामुळे समान नागरी कायदा ची अंमलबजावणी करू नये अशी एक मुखी मागणी शुक्रवारी शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन विधी आयोगाचे अध्यक्ष यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत लिखित स्वरूपात सादर करून आपला विरोध नोंदविला आहे. सदर निवेदन आस्थापनाचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी स्वीकारले.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
मनियार बिरादारीचे फारूक शेख, कुलजमातीचे सैयद चाँद, वहिदत ए इस्लामी चे अतिक अहेमद,राष्ट्रवादीचे मझर पठाण व सलीम इनामदार ,काँग्रेसचे बाबा देशमुख व अमजद पठाण, एमआयएमचे खालिद खाटीक व सईद शेख, शिवसेनेचे जाकीर पठाण, ईद गाह ट्रस्टचे अनिस शहा, सिकलकर फाउंडेशनचे अन्वर खान, हुसेनी सेना चे फिरोज शेख, बेलदार बिरादरीचे नूरखान, नुरी फाउंडेशन चे नाझीम पेंटर,इमदाद फाउंडेशन चे मतीन पटेल, बी वाय एफ चे शिबान अहेमद व दानिश खाटीक,व आदींची उपस्थिती होती

तहसीलदार विजय बनसोड यांना निवेदन देतांना वहिदत ए इस्लामीचे अध्यक्ष अतिक अहेमद,फारूक शेख,मझहर पठाण,अमजद पठाण, सलीम इनामदार, आदी दिसत आहे.

आक्षेप नोंदवण्या चे आवाहन

जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,डॉक्टर वकील धार्मिक ,आणि विशेषता महिला आणि लहान मोठ्या संघटना व विविध व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी या कायद्याविरोधात १३ जुलै च्या आत आपला लेखी विरोध नोंदवावा.
विरोध नोंदवण्यासाठी विधी आयोगाकडे लिखित स्वरूपात मेल अथवा निवेदन देण्यात यावे सदर निवेदनाचा मसुदा प्रोफार्मा तयार असून तो रथ चौक येथील मानियार बिरादरीचे कार्यालय, अजिंठा चौक येथील ईदगाह ट्रस्ट चे कार्यालय तसेच शहरातील सर्व मस्जिद व मदरसा येथे उपलब्ध आहे तरी त्वरित फॉर्म भरून पाठवावे असे
आवाहन मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.
फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!