कायदेविषयक जनजागृती शिबीर…

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर स्वामिविवेकानंद इंटरनॅशनल स्कूलयेथे तालुका विधि सेवा समितीअंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिरचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी एन. आर. यालमाने, वकील संघाचे सदस्य अॅड. आर. व्ही. निकम, मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे, उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर उपस्थित होते.
न्यायदंडाधिकारी एन.आर. यालमाने यांनी विद्यार्थ्यांना फौजदारी व दिवाणी कायदा यातील फरक, लैंगिक शोषण कायदा कधी व का अमलात आला, न्यायालयीन कामकाज, बाल गुन्हा याविषयीचे मार्गदर्शन केले. या शिबीराला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अपेक्षा मगरे यांनी आभार मानले.