गुरुवार २९ जून ला बकर ईद साजरी होणार कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये – आवाहन

जळगाव ( प्रतिनिधि )
ईद उल अजहा अर्थातच बकरी ईद हा सण २९ जून गुरुवारी साजरा होणार असून ईद ची नमाज अजिंठा चौक येथील ईदगाहच्या मैदानावर सकाळी ७.४५ वाजता अदा केली जाणार असून तसा ठराव सोमवारी रात्री जामा मस्जिद जळगाव येथे झालेल्या रुहते हिलाल कमिटीच्या मीटिंगमध्ये पारित करण्यात आला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी जामा मशीद मरकज चे मौलाना उस्मान कासमी हे होते.
सर्वप्रथम ईदगाह ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी मागील इतिवृत्त सादर केले व ईद बाबत आलेले शासनाच्या परिपत्रकांची माहिती सभेसमोर ठेवली.
मुफ्ती अतिकूर रहेमान यांनी ईद बाबत महत्व विशद केले.
अध्यक्ष वाहब मलिक यांनी खालील ठराव सादर केले असता ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले
ठराव
१) ईदगाह मैदानावर सकाळी ७.४५ वाजता ईद ची जमात उभी राहील.
२) मुस्लिम बांधवांनी तीन दिवसीय ईद साजरी करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखता कामा नये याची काळजी घ्यावी.
३)गुरुवारी सकाळी पाऊस असल्यास प्रत्येक मशिदीत नमाज अदा केली जाईल वेळे बाबत संबंधित ट्रस्टने निर्णय घ्यावा.
सभेत यांची होती उपस्थित
मुफ्ती अतिक, मुफ्ती रमिज,मौलाना रेहान,मौलाना वसीम पटेल, मौलाना हाफिज रहीम, मौलाना मोहम्मद सलाम, मौलाना तलाह उस्मान, वहाब मलिक,फारूक शेख,अनिस शाह, अश्फाक बागवान, यासीन बागवान, शाहिद सय्यद, शब्बीर गुलशेर, सादिक सय्यद, समीर शेख, ताहेर शेख, आरिफ शेख, रेहान निसार, मुस्ताक अहमद, अफजल खान,आदिनची उपस्थिती होती.
सभेचे समारोप दुआ ने झाले असले तरी ट्रस्ट तर्फे सह सचिव अनिस शाह यांनी आभार मानले.