धुळे M.I.D.C. येथे अग्निशमन केंद्राचे आ. फारूक शाह यांचे हस्ते शुभारंभ.

धुळे ( अनीस खाटीक )धुळे येथील अवधान शिवारात असलेला MIDC चा विस्तार वाढत असून MIDC भागात सुरक्षेचे कोणतेच साधन उपलब्ध नव्हते त्यामुळे त्याभागात कारखांण्यांना आगी लागण्याच्या घटना घडत होत्या, त्यामुळे करोडो रुपयाचे नुकसान
व्यापारांचे होत होते.म्हणून सुसज्ज अग्निशमन केंद्राची अत्यंत गरज होती.त्यादृष्टीने धुळ्यातील उद्योजकांनी आ.फारुख शाह यांचेकडे सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली होती.त्यानुसार आ.फारुख शाह यांनी उद्योग मंत्री ना.उदय

सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. आ.शाह यांची मागणी लक्षात घेवून उद्योग मंत्र्यांनी निधी मंजूर केला
गेल्या काही दिवसांपूर्वी मधुर इंडस्ट्रीज आणि केशरानंद जिनिंगला प्रमाणात आग लागली होती. या ठिकाणी धुळे महानगरपालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या होत्या परंतु धुळे शहरातून एम. आय. डी. सी. कडे जाणारा रस्ता हा खूप जास्तीचा वर्दळीचा व शहरापासून १० किमी अंतराचा असल्यामुळे अग्निशमनची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहचली नाही. परीणामी मोठ्या प्रमाणात उद्योजकांचे नुकसान झाले होते. या घटनेमुळे फायर स्टेशनची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच एम.आय.डी.सी. तील सर्व औद्योगिक संघटना स्वतंत्र फायर स्टेशन होण्याकामी प्रयत्नशील होते. तसेच आँगस्ट २०१६ मध्ये औद्योगिक संघटनांनी फायर सेस भरण्यास तयार असल्याचा ठराव केला. या ठरावाचे पत्र एम.आय.डी.सी प्रशासनाला दिल्या नंतरही सहा वर्षाचा कालावधी उलटला असूनही फायर स्टेशन झाले नव्हते आ. फारूक शाह यांच्या प्रयत्नाने हे फायर स्टेशन मंजूर होऊन या ठिकाणी सुसज्ज असे फायर स्टेशन होणार असून त्याचा आज आ. फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या फायर स्टेशन मध्ये दोन फायर फायटर गाड्या सहित अन्य साधने राहणार आहे तसेच आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नाने सुसज्ज अशा विभागीय कार्यालय इमारती साठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.याकामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून काम सुद्धा लवकरच सुरु होणार आहे, या कार्यक्रमाला आ.शाह यांचे सोबत हाजी छोटू शाह,नगरसेवक आमिर पठाण,प्यारेलाल पिंजारी,निजाम सय्यद,MIDC चे अभियंता स्वप्निल पाटील,अभियंता मोहिते,डॉ.बापुराव पवार, इकबाल शाह,जमील खाटीक,अनिस शाह,आसिफ शाह शहरातील उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.