अमळनेर येथे दोन मुस्लिम तरुणांच्या एकाच दिवशी मृत्यू..

अमळनेर(प्रतिनिधि)
अमळनेर येथे दोन मुस्लिम तरुणांच्या एकच दिवशी विविध घटनेत मृत्यू झाल्याने शहरातील दर्गा अली मोहल्ला व कसाली मोहल्ला येथे शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे
शहरातील दर्गा अली मोहल्ला येथील रहिवासी कमालोद्दीन शेख वय ४४ हे बांधकामांचे काम करून आपल्या मोटर सायकल ने पारोळा येथून अमळनेर कडे घरी येत असताना रात्रि 9 वा, रत्नापिम्परी जवळ उभ्या असलेल्या डंपरला मागून टक्कर लागल्या ने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले होते परंतु रस्त्यावरच त्यांचा मृत्यू झाला, तर दुसरी घटना मधे आबिद खान वय ३५ (मेवाती ) हा मध्य प्रदेश खरगोन येथे बहीनी कड़े खाजगी कामा निमित्त गेला असता रत्रि झोपेत असताना त्याला हृदयविकार चा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्याचा शव अमळनेर ला आणल्या नंतर रात्री १० वाजता त्याची अंत यात्रा किल्ला चौक येथून काढण्यात आली त्याच्या पश्चात १ मुलगा व ५ मुली असा परिवार आहे.