डॉ संजय भावसार महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित..

एरंडोल (प्रतिनिधी) पारोळा क्रीडा क्षेत्रातील एक अग्रगण्य खेळाडू , शिक्षक , मार्गदर्शक, मदतनीस अश्या विविध रूपात सक्रिय असलेले आर एल कॉलेजचे उपप्राचार्य प्रा डॉ संजय भावसार यांना नाशिक येथे 25 जून रोजी उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार नाशिक चे पालकमंत्री श्री. दादासाहेब भुसे यांचा हस्ते देण्यात आला . ही बाब पारोळा शहरातील व जिल्ह्यातील सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी तसेच सरांचे सहयोगी ,मित्र परिवार यांना भूषणावह आनंदाची आहे सरांचे क्रीडा क्षेत्रात खूप मोठे उल्लेखनीय योगदान आहे त्यांनी आर एल कॉलेजला मल्लखांब फ्लोअर बॉल, मिनिगोल्फ या खेळात अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत गोल्ड ,सिल्वर, ब्राँझ मेडल मिळवून देऊन कॉलेजचे व के.बी.सी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव रोशन केले आहे. .सर स्वतः उत्कृष्ठ बॅडमिंटन पटू असून गेल्या २५ वर्षा पासून नियमित आजही खेळतात .असे क्रीडा क्षेत्राशी व त्यांचे करोना काळातील खेळाडू सोबत केलेल्या महत्त्वाचे योगदान, सामाजिक क्षेत्राशी ,तन मन धन पूर्वक जोडलेली व्यक्ती. प्रा डॉ संजय भावसार यांची निवडकर्ते यांनी अचूक योग्य स्तुत्य निवड केली आहे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन