पोलिसांनी केले पथ संचलन

अमळनेर(प्रतिनिधि) येथे कायदा सुस्थितीत व अबाधित रहावा या साठी पोलीस अधिकारी व कर्मचायांनी नागरिकाची भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसावा म्हणून शहरातील गांधलीपुरा पोलिस चौकी, मोठी
बाजार पेठ, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली मोहल्ला, माळीवाडा, झामी चौक परिसरातून पथ संचलन करण्यात आले. यावेळी उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, शितलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो. उ. नि. भैयासाहेब देशमुख, पो.उ.नि. विलास पाटील, पो. उ. नि. विकास शिरोळे, पो. उ. नि. अक्षदा इंगळे, विनोद पाटील, जाधव आदी अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला पोलिस, होमगार्ड आणि तीन आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते.