न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपोर्णिमा उत्सव संपन्न..

एरंडोल ( प्रतिनिधि )
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि. 3/07/2023ला गुरुपोर्णिमा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रथम शाळेच्या व्हा प्रिन्सिपल सरीता पाटील यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतीमे चे पूजन करण्यात आले व तसेच शाळेतील काही,विद्यार्थी महर्षी व्यास यांच्या विशभूषेत आले होते तसेच शाळेत इंग्रजी भाषा वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात विद्यार्थ्यांनी वेदव्यासजी गुरु द्रोणाचार्य यशस्वीते मधील राज या विषयावर आपली मते मांडली तर सातवी व,चौथी च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गाण्यावर नृत्य सादर केले तर इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतीमा शाळेला भेट दिली तर आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार केला व तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांनी महाभारत मधील गुरु द्रोणाचार्य व एकलव्य या गुरु शिष्य या वर नाटीका सादर केली व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रतीनिधी अनिता तिवारी सागर शिंपी यांनी तयारी करुन घेतरी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मयुरी पाटील व चैताली पाटील यांनी केले तर आभार उप शिक्षक आरती भेलसेकर व कविता पाटील यांनी केले या वेळी शाळेतील व्हा .प्रिन्सिपल सरीता पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते..